अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर कार्यकारिणी गठीत…

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर कार्यकारिणी गठीत…

ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता , ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता व ग्राहकांचे अधिकार जाणून घेण्याकरिता अखिल भारतीय ग्राहक पंचायत रजि. नं. S – 9194 दिल्ली अंतर्गत चंद्रपूर शहर तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यात आलेले आहे. हि कार्यकारिणी श्री पुरुषोत्तम जी मत्ते, व श्री वसंतराव वराडे भद्रावती ग्राहक पंचायत यांच्या अध्यक्षतेखाली सरकार नगर, गजानन महाराज देवस्थान येथे गठीत करण्यात आली . अध्यक्ष पदी श्री अण्णाजी ढवस , संघटन मंत्री : श्री प्रशांत कावळे , सचिव पदी श्री हेमराज नंदेश्वर , कोषाध्यक्ष : श्री महेश कानपिल्लेवार , उपाध्यक्ष : श्री राजू भाऊराव साखरकर , सहसंघटन मंत्री : श्री अशोक जी मुडेवार , सहसचिव : श्री गोकुळदास पिंपळकर , प्रसिद्धी प्रमुख : श्री जितेंद्र चोरडिया , सह कोषाध्यक्ष : श्री नानाजी सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . तसेच महिला प्रमुख सौ . उषाताई मेश्राम , सौ. वनिता नंदेश्वर, सौ. कल्पनाताई गिरडकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य : श्री प्रभात कुमार तंन्नीरवार , श्री दादाजी किसन चन्ने, श्री रमेश खुशाल साहू , श्री भास्कर इसनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. *तरी सर्व ग्राहक मित्रांना सुचित करण्यात येते की आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याकरिता आपण वरील समितीच्या सदस्यांशी संपर्क करावा ही नम्र विनंती.

संपर्क कार्यालय : सरकार नगर, श्री गजानन महाराज देवस्थान जवळ , चंद्रपूर .