जिल्हयात हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिमेची यशस्वी सांगता

जिल्हयात हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिमेची यशस्वी सांगता

 

गडचिरोली, दि.20: गडचिरोली जिल्हा हा भौगोलीक दृष्टया डोंगराळ, दुर्गम व जंगलाने व्याप्त असून संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या अधिक आहे हा भाग हिवतापासाठी अतिसंवेदनशिल असून जिल्हयात माहे जुलै – ऑगष्ट व

डिसेंबर जानेवारी या दोन सत्रात हिवताप रुग्ण संख्येत वाढ होत असते.हे सक्रिय संक्रमण शोधून काढून

त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी हिवताप मोहिम राबविण्यात येते.ज्या भागात API 10 पेक्षा जास्त असलेली गावे व हिवतापाने मृत्यू झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हि मोहिम राबविण्यात आली तसेच हिवताप बाधित रुग्णांचे पूर्णसंक्रमण रोखण्यासाठी हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिम जिल्हयात दिनांक 1 डिसेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत राबवून उदिष्ठ पुर्तता करण्यात आली व हि मोहिम यशस्वी करण्यात आली.

 

गडचिरोली जिल्हयात हिवतापाचे रुग्ण सर्वाधिक असल्याने वाढत असलेल्या हिवतापाचे संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने जिल्हयातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या भामरागड,एटापल्ली,कोरची,अहेरी,धानोरा, कुरखेडा या 6 तालूक्यातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 01 डिसेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आली.

 

सदर मोहिमेत 16 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 115 आरोग्य उपकेंद्रातील 672 गावांचा समावेश करण्यात आलेला होता.या मोहिमेत 1,54,096 लोकसंख्येचे आरडीके व्दारा तर 87,895 लोकसंख्येचे रक्त नमूने व्दारा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले.तसेच अतिरिक्त मणूष्यबळ रक्तनमूने गोळा झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पोहचविण्यासाठी 23 रनर व रक्तनमूने रंगप्रक्रिया करणेसाठी 23 स्टेनर् तसेच रक्तनमूने तपासणी करण्यासाठी बाहेरजिल्हयातून 23 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

 

यासोबतच या मोहिमेचे काम योग्य प्रकारे होणेसाठी व पर्यवेक्षणासाठी 16 आरोग्य सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर संनियंत्रणासाठी प्रत्येकी 1 असे 6 मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक यांनाही नियुक्त करण्यात आले.हिवताप सर्व्हेक्षण मोहिम कालावधीत 87,895 रक्तनमुने पैकी 69,609 रक्तनमूने तपासले असून उर्वरीत 27009 रक्तनमूने एक आठवडयात तपासून होणे अपेक्षित आहे. त्यापैकी 53 हिवताप दुषीत रुग्ण आढळून आले.

 

तसेच 1,54,101 आरडीके चे उदिष्ठ ठेवण्यात आले होते.त्यापैकी 1,25,588 आरडीके व्दारा तपासणी करण्यात आली त्याची टक्केवारी 81.50 % असून त्यापैकी 305 आरडीके हिवताप दुषित आढळून आले.सदर सर्व्हेक्षण कालावधीत एकूण 358 हिवताप दुषित रुग्ण आढळून आले असून सर्वांना जिल्हास्तरीय पर्यवेक्षक,आरोग्य सहाय्यक यांचे मार्फत समुळ उपचार करण्यात आला.

 

या पैकी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक 156 हिवताप दुषित रुग्ण आढळून आलेल्या मेळदापल्ली उपकेंद्रातील बंगाडी व कवंडे या गावात जिल्हा स्तरावरुन राजेश कार्लेकर (व्हि.बी.डी. सल्लगार) व संजय समर्थ (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी) यांनी भेट देऊन सदर गावात हिवताप मोहिमेची पाहणी केली. यामध्ये प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक तसेच हिवताप दुषित रुग्णाना प्रत्यक्ष भेट देऊन समूळ उपचार झाल्याची खात्री करण्यात आली.सोबतच दोन्ही गावात मच्छरदाणी वापराबाबत व हिवताप किटकनाशक फवारणी बाबत तसेच किटकजन्य आजाराबाबत नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले.

 

सदर मोहिम हिवताप रुग्ण संख्या कमी करणे व हिवताप मृत्यू रोखण्यासाठी यशस्वी झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले व या मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले.