अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करावे – प्रकल्प अधिकारी निरज मोरे

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करावे – प्रकल्प अधिकारी निरज मोरे

 

भंडारा, दि. 20 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे, एकात्मिक आदिवासी विकास विभाग भंडारा यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रिशिपचा लाभ देण्याकरिता शासनाने Mahadbtmahait.gov.in हे Online पोर्टल सुरू केले आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 करिता ज्या आदिवासी विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी व त्या पुढील शिक्षणाकरिता शासन विद्यापीठ मान्यता प्राप्त शाळा, महाविद्यालय, संस्थेत प्रवेश घेतला अश्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अर्ज वेळेत भरावे. अर्ज सादर करतांना बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रिका, स्वत:चे डोमेशिअल प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यंत अपलोड करावी, जेणेकरून शिष्यवृत्ती, फ्रिशिपचा लाभ देणे शक्य होईल. तसेच शाळा, कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे परिपुर्ण असलेले अर्ज तातडीने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावे.