सिंदेवाही तालुक्यात वन्यजीव मानव संघर्ष सुरूच…

सिंदेवाही तालुक्यात वन्यजीव मानव संघर्ष सुरूच…

(प्रभावित परिसरातील खासगी व शासकीय भूखंडावरील कचरा व झुडपे तोडून परिसर स्वच्छ करावे)

 

चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षक वाघामुळे, हिंसक प्राण्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जाण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात वनविभाग सतर्क झाले आहेत. तसेच वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा नरभक्षक जंगली जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल अशी तंबी सुद्धा दिली आहे. तरी परंतू सिंदेवाहीत तालुका क्षेत्रात काही अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

आज सकाळी मॉर्निंग वॉक ला गेलेल्या ईसमावर प्राणघातक हल्ला अस्वलीने केला आहे.

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रात अनेक दिवसांपासून हिंसक जंगली प्राण्यांचा वावर सुरू आहे. परंतु वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात सकाळी लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी अस्वलिचा हल्ला झाला होता. अशा प्रकारची घटना वारंवार होऊ नये म्हणून घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी शहरातील भात गिरणी च्या आत वाघने पंधरा तास काढले होते. वनविभागाच्या मोठ्या कसरतिनंतर वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते. त्या वेळेस हजारो लोकांनी वाघाला बघण्यासाठी गर्दी केली होती. एकदा बिबट वाघाने धुमाकूळ घातला होता. लोकांची दाट वस्ती असलेल्या पंचशील नगर येथे घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. जंगली डुक्कर अनेकदा शहरातुन परिक्रमा करतांना लोकांना आढळतात. अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतांना सुद्धा वनविभागाने यासाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याने वन्यजीव व मानव संघर्ष सुरूच आहे. ज्या भागात जंगली जनावरांचा वावर आहे अशा परिसराची स्वच्छता करणे आवश्यक होते. मात्र अद्यापही स्वच्छता झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही खासगी व शासकीय भूखंडावरील झाडीझुळपे वाढले असल्याने जंगली जनावरांना त्याचा फायदा होत आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांनी आपली वेळ बदलवुन उशिरा फिरायला जात आहेत. महत्वाचे म्हणजे शाळेचे विद्यार्थी शिकवणी वर्गात किंवा शाळेत जाण्यासाठी सकाळी सहा वाजता पासून घरून निघून जातात. अशा वेळेस यांच्या जिवाची जिम्मेदारी कोन घेणार असा मोठा प्रश्न पालकांना व नागरीकांना पडला आहे.

कुणा निष्पाप लोकांचे जिव गेल्यावर त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यापेक्षा वनविभागाने काही पैसे खर्च करून सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रातील व गडमौशी या परिसरातील खासगी व शासकीय भूखंडावरील कचरा व झुडपे तोडून परिसर स्वच्छ करावे. आणि वनविभागाने प्रभावित क्षेत्रातमधे कमीतकमी सकाळी आणि सायंकाळी गस्ती करावी. अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.