ग्रामपंचायत मतदानासाठी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ग्रामपंचायत मतदानासाठी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

भंडारा, दि. 16 : 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या 305 ग्रामपंचायत सार्वत्रिक ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी याव्दारे भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीला लागू राहील. (खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी)

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना देणे आवश्यक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत.