यशस्वी उद्योजकांना जिल्हा पुरस्कार 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित

यशस्वी उद्योजकांना जिल्हा पुरस्कार 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 12 : उद्योग चालविण्यासाठी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी व त्यासाठी शासकीय पातळीवर कौतुक व्हावे व उद्योजकांचा उत्साह द्विगुणीत व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत यशस्वी उद्योजकांना जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील 1 जानेवारी 2018 पुर्वी स्थायी नोंदणी झालेले व सतत दोन वर्षे उत्पादन करीत असलेले घटक जे कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नाहीत अशा लघु उद्योजक घटकाची निवड करण्यात येते. प्रथम पुरस्कार 15 हजार रुपये रोख व द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये रोख, तसेच शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो.

 

भंडारा जिल्ह्यातील लघुउद्योजकांनी सन 2022 च्या पुरस्कारासाठी जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत भाग घ्यावा. सदर योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जासोबत उद्योग आधार, मागील तीन वर्षाचा ताळेबंद (Balance Sheet) व बँकेचे/वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसल्याचे (कर्ज घेतले असल्यास) प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, तळमजला राष्ट्रीय महामार्ग क्र. 6, भंडारा येथे संपर्क साधावा. असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी कळविले आहे.