सिन्देवाही || प्रभाग क्रमांक १३ येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी… 

0

सिन्देवाही || प्रभाग क्रमांक १३ येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी… 

तेली समाजाचे आराध्य दैवत मानवतेची शिकवण देणारे थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयतीनिमित्त प्रभाग क्रमांक-१३ भरडकर मोहल्ला सिंदेवाही येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली . 

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संताजीच्या प्रतिमेस माल्याअर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी रघुनाथ शेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे स्वप्नील कावळे,नगराध्यक्ष, प्रा. डॉ वरभे सर, किशोर भरडकर नगरसेवक, अरून कोलते,राजु कराळे, प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच समाज सेवक सोमाजी भरडकर, रामदास भरडकर, नामदेव ठाकरे ,संदीप भरडकर सर, दुधाराम ठाकरे आशा गंडाटे, छबूताई नागोसे , जयश्री कावळे तसेच संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती युवराज ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here