जिल्हा प्रशासनाद्वारे संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन..

गडचिरोली, दि.08: संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाद्वारे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी, धनाजी पाटील,यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर, आशीष सोरते,श्री.चंहादे, दयाराम मेश्राम, उमाकांन्त चतुर,वामन खंडाईत,मनोहर बेले आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.