गडचिरोली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याबाबत

गडचिरोली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याबाबत

 

गडचिरोली, दि.07: जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यतील युवक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांकडून (नोंदणीचा अधिनियम 1860 व 1950) पंजीबंद्ध संस्थांकडून कार्यालयात उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्जाप्रमाण अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या संस्थांचे अनुदानाकरीता प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांनी विविध समाजसेवा शिबीरांचे आयोजन केले आहे अश्या संस्थांनी आपले विविध नमुना अर्जाप्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव दि. 25 डिसेंबर, 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रस्ताव सादर करावी. अनुदानाबाबतचा विहीत नमुना अर्ज कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येतील.

तरी या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव सादर करावे असे आव्हान श्री.प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली हे करीत आहे.