वाळूगट निश्चिती सर्वेक्षण अहवालावर अभिप्राय आमंत्रित

0

वाळूगट निश्चिती सर्वेक्षण अहवालावर अभिप्राय आमंत्रित

चंद्रपूर, दि. 7 : खनिकर्म विभागाद्वारे जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. सदर अहवाल httpa://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून रेती घाट लिलावाच्या अनुषंगाने नागरिकांनी आपले अभिप्राय उपरोक्त संकेतस्थळावर नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

            चंद्रपूर जिल्हयातील सन 2022-23 या वर्षसत्राकरिता वाळूगटांच्या राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरीता खनिकर्म विभागामार्फत अर्ज सादर करण्यात येणार आहे.  त्याकरीता सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. सदर अहवाल केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय यांनी जानेवारी 2022 मध्ये प्रसिध्द केलेल्या रेती उत्खनन मार्गदशक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता व अभिप्रायासाठी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here