जिवती ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे सीईंओचे निर्देश Ø तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयास दिली भेट

जिवती ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे सीईंओचे निर्देश

Ø तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयास दिली भेट

चंद्रपूर, दि. 7 : अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या जिवती तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील बांधकाम व पाणी टंचाईबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करून सदर रुग्णालयाचे बांधकाम माहे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिवती तालुक्यातील आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिवती येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला भेट देत कामाची पाहणी केली. पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जुनी असल्यामुळे त्या इमारतीला निर्लेखीत करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागाला दिल्या. तत्पुर्वी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथे भेट दिली. यावेळी श्री. जॉन्सन यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाची प्रशंसा करत दिवस-रात्र काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी जिवतीचे गटविकास अधिकारी भगवत रजेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे प्रामुख्याने उपस्थित होते.