जिल्हा युवा पुरस्कारासाठी 2 जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 2 जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

 

चंद्रपूर, दि.5 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थाकडून 2 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

युवा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वैयक्तिक स्वरूपात एक युवक- युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख रुपये 10 हजार, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. संस्थेकरिता पुरस्काराचे स्वरुप रोख रु. 50 हजार, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. संस्था ह्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असाव्यात. पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय 1 एप्रिल 2019, 2020 व 2021 रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च 2020, 2021 व 2022 रोजी 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.

 

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी तसेच नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर या कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावे व आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. 2 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हिल लाइन, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.