जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा….

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा….

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ,चंद्रपूर व समग्र शिक्षा, समावेशीत शिक्षण पंचायत समिती सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्र 1 येथे आज दिनांक 3 डिसेंबर 2022 ला जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका विना नामपल्लीवार मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री अमोल वैद्य समावेशीत शिक्षण तज्ज्ञ व श्री रेवन मोहूर्ले विषय साधनव्यक्ती गट साधन केंद्र पंचायत समिती, सिंदेवाही हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांगाचे प्रेरणास्थान हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्याचबरोबर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री चित्रसेन रामटेके विशेष शिक्षक यांनी करून जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्याचा उद्देश व महत्व काय? हे स्पष्ट करून दिले.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी  अमोल वैद्य समावेशित शिक्षण तज्ज्ञ यांनी दिव्यांगाचे प्रेरणास्थान हेलन केलर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या प्रेरणेतून सर्वांना मार्गदर्शन केले दिव्यांग विद्यार्थी सुद्धा कुठेही क्षेत्रात मागे नसून त्यांच्यामध्ये सुप्त गुण दडलेले असतात त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी शाळा स्तरावर 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर हा जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात यावा व होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे व त्यांना सुद्धा सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे समान संधी प्राप्त करून द्यावी असे मनोगत व्यक्त केले. रेवन मोहुर्ले विषय साधन व्यक्ती यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून दिव्यांग विद्यार्थ्यांना कधीही कमी लेखू नये असा संदेश विद्यार्थ्यांना दिला त्याचबरोबर दिव्यांगांना परीक्षेमध्ये ,नोकरीमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा तथा आरक्षण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दिव्यांगासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय तयार होणार असल्याची घोषणा केलेली असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट करून दिले. मा.मुख्याध्यापिका विना नामपल्लीवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यावर मार्गदर्शन केले दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मानसिक दृष्ट्या खचून न जाता आपल्या मुलांमध्ये असणारे सुप्त गुण ओळखले पाहिजे व त्यानुसार आपल्या मुलाला प्रत्येक क्षेत्रात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले पाहिजे अशी भूमिका मांडली. सदर कार्यक्रमाच्या जाणीवजागृती करीता गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. व मुलांसाठी संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील सर्व शिक्षक वृंद व स्वयंसेवक अश्विनी येगेवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक यांची उपस्थित होती

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.शालिनी कोचे मॅडम यांनी करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.