भंडारा जिल्हा परिषदेसाठी 21 डिसेंबरला मतदान

भंडारा जिल्हा परिषदेसाठी 21 डिसेंबरला मतदान

  • 22 डिसेंबर रोजी मतमोजणी

भंडारा, दि. 30 : भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्यांतर्गतच्या 7 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू  होईल.

भंडारा जिल्हा परिषदेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

 तुमसर मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय तुमसर तर मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर येथे होईल. मोहाडी मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय मोहाडी तर मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी येथे होईल. साकोली मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय साकोली तर मतमोजणी तहसील कार्यालय साकोली येथे होईल. लाखनी मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण पंचायत समिती लाखनी तर मतमोजणी समर्थ विद्यालय लाखनी येथे होईल. भंडारा मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण बचत भवन तहसील कार्यालय भंडारा तर मतमोजणी पोलिस बहुद्देशिय सभागृह भंडारा येथे होईल. पवनी मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय पवनी तर मतमोजणी नगर परिषद कनिष्ट महाविद्यालय पवनी येथे होईल. लाखांदूर मतदार विभागासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण शासकीय तांत्रिक विद्यालय लाखांदूर तर मतमोजणी शासकीय तांत्रिक विद्यालय लाखांदूर येथे होईल.

पंचायत समितींसाठी कार्यक्रम खालील प्रमाणे

 पंचायत समितीच्या तुमसर निर्वाचक गणासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय तुमसर येथे तर मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर येथे होईल. मोहाडी निर्वाचक गणासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण मोहाडी तहसील कार्यालय येथे तर मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी येथे होईल. साकोली निर्वाचक गणासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण साकोली तहसील कार्यालय येथे तर मतमोजणी तहसील कार्यालय साकोली येथे मतमोजणी होईल. लाखनी निर्वाचक गणासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण पंचायत समिती लाखनी येथे तर मतमोजणी समर्थ विद्यालय लाखनी येथे होईल. भंडारा निर्वाचक गणासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण बचत भवन तहसील कार्यालय भंडारा येथे तर मतमोजणी पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथे होईल. पवनी निर्वाचक गणसाठी  नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय पवनी तर मतमोजणी नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथे होईल. लाखांदूर निर्वाचक गणासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचे व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण शासकीय तांत्रिक विद्यालय लाखांदूर येथे तर मतमोजणी शासकीय तांत्रिक विद्यालय (आयटीआय) लाखांदूर येथे होईल.