विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा :- योगेंद्र जयस्वाल

सिंदेवाही
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा. पूर्ण तयारी करून स्पर्धेत भाग घेतल्यास यश आपोआप आपल्या मागे येईल, असे विचार विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही चे अध्यक्ष योगेंद्र जयस्वाल यांनी व्यक्त केले. ते सर्वोदय कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येते आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
पं जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारित शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा, पोस्टर अपलोड करणे इ ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सर्वोदय कन्या विद्यालयातून कु. रश्मी झाडे, कु. स्मिता जोनमवार, कु. उर्वशी कुमरे, कु. केजुषा लोखंडे, कु. प्रेरणा ठिकरे, कु. तेजस्वी झाडे, कु. जानवी पोपटे इ विद्यार्थिनींनी यश प्राप्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेंद्र जयस्वाल होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अरविंद जैस्वाल, प्राचार्या संगीता यादव, पर्यवेक्षक भाऊराव दडमल यांची उपस्थिती होती. यावेळी कु. तेजस्वी झाडे, प्राचार्या कु संगीता यादव, सचिव अरविंद जैस्वाल, पर्यवेक्षक भाऊराव दडमल यांनीही विचार व्यक्त केले. संचालन किशोर कावळे तर आभार प्रदर्शन विलास धुळेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप भरडकर, विशाल मुजारीया, विनय खोब्रागडे, लिखित उजवावकर, वनिता कस्तुरवार यांनी प्रयत्न केले.‎