जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

भंडारा, दि. 29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेमध्ये वुडबॉल, मॉडर्न पेंटथलॉन, रायफल शुटींग, किकबॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, फुटसॉल, हापकिडोबॉक्सींग, युग मुन दो, वोवीनाम, पेन्टाक्यु, स्पोर्टस डान्स, वुडो, आष्टेडू आखाडा, बेल्ट रेसलिंग, पॉवरलिफ्टींग, तेंगसुडो, मिनी गोल्फ, कुराश, स्क्वॅश, मोन्टेक्स बॉल क्रिकेट, सुपर सेव्हन क्रिकेट, थायबॉक्सींग, टेनिस व्हॉलीबॉल, बिच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, टेनिस क्रिकेट, कार्फ बॉल, ड्रॉपरोबॉल, चॉकबॉल, फुटबॉल टेनिस, टेनिस बॉल क्रिकेट, रोलबॉल, सायकलींग, चायक्वांदो, थांगता मार्शल आर्ट, रोप स्किपिंग, रग्बी, फिल्ड आर्चरी, सिलंबम, सॉफ्टेनिस, ग्रपलिंग, कुडो, फ्लोअर बॉल, लगोरी, जितकुंदों, टेबल सॉकर,हुपकांदो, लंगडी, स्पिडबॉल, म्युझिकल चेअर व जंपरोप या क्रीडा प्रकाराच्या संघटनांनी धर्मादाय आयुक्त यांचेकडे संस्था नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, राज्य संघटनेस जिल्हा संघटना संलग्न असल्याबाबतचे पत्र, जिल्हा संघटनेच्या घटनेची प्रत व जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही बदल झाले असल्यास चेंज रिपोर्टची कागदपत्रे दिनांक 1 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.