सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान रॅली

सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान रॅली

 

चंद्रपूर, दि. 29 : दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जि.प. समाज कल्याण विभाग आणि स्व.सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली यांचेतर्फे संयुक्तरित्या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सदर रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जटपुरा गेट मार्गे निघून महात्मा गांधी पुतळ्जवळ रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले.

रॅलीत समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम तसेच स्व.सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय आणि मागासवर्गीय मुलींचे व मुलांचे शासकीय वसतीगृहातील शिक्षक, गृहपाल, कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.