उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने वाहन तपासणी मोहिम

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने वाहन तपासणी मोहिम

गडचिरोली, दि.21 : सर्व जनतेस तसेच वाहन चालक, मालक यांना सुचित करण्यात येते की,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये अवैध प्रवासी वाहतूक, सिट बेल्ट न बांधणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालकाकडे वैध व योग्य अनुज्ञप्ती नसणे, वाहनाचा वैध विमा नसणे, वाहनास योग्य तऱ्हेने परावर्तीका (रि्फलेक्टर) लावलेले नसणे. वाहनास टेल लॅम्प नसणे तसेच माल वाहनातुन प्रवासी वाहतूक करणे इत्यादी विरोधात तपासणी करण्यात येणार असून दोषी वाहनांवर तसेच व्यक्तींवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

शासनामार्फत सर्व बाबींवरील दंडाची रक्कम वाढविण्यात आलेली असून वाढीव दराने दंड वसूल करण्यात येणार आहे. वाहन चालवितांना उपरोक्त प्रमाणे सर्व वैध कागदपत्र सोबत बाळगण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली विजय चव्हाण यांनी केले आहे.