कोविड-19 मध्ये रिक्षा चालकांना जाहीर केलेल्या पॅकेज संदर्भातील ऑनलाईन प्रणाली बंद

कोविड-19 मध्ये रिक्षा चालकांना जाहीर केलेल्या पॅकेज संदर्भातील ऑनलाईन प्रणाली बंद

भंडारा, दि. 25: कोविड-19 च्या दुसऱ्या लाटे दरम्यान आर्थिक दुर्बल घकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी 1 हजार 500 रूपये एक वेळचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होतो.

ऑनलाईन पध्दतीने या प्रणालीवर शेवटचा अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त झाला असून ऑफलाईन पध्दतीने दिनांक 25 मार्च 2022 रोजी प्राप्त झाला. 4 ते 6 महिन्यापासून या योजनेत एकही अर्ज प्राप्त न झाल्याने परवानाधारक रिक्षा चालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भात योजनेची ऑनलाईन प्रणाली बंद करण्यात आली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.