एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचे 5 दिवसीय प्रशिक्षण

0

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचे 5 दिवसीय प्रशिक्षण

 

भंडारा, दि. 17 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीमध्ये विकसित नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत भंडारा, मोहाडी, तुमसर व पवनी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे राज्यांतर्गत प्रशिक्षण 5 दिवसीय सहल 19 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कृषि विभागातर्फे आयोजित करण्यात आली आहे.

 

प्रशिक्षणाकरीता इच्छुक असलेल्या शेकऱ्यांनी भंडारा, मोहाडी, तुमसर व पवनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन भंडाराचे उपविभागीय कृषि अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here