122 धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची नोंदणी व धान खरेदी करण्याची मंजुरी

122 धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची नोंदणी व धान खरेदी करण्याची मंजुरी

 

भंडारा, दि. 17 : आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2022-23 अंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्ह्यामध्ये नवीन धान खरेदी निवड समितीने मंजुरी दिलेल्या 122 खरेदी केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केलेली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील 17, मोहाडी 9, तुमसर 15, लाखांदूर 22, पवनी 31, लाखनी 12 व साकोली 16 असे जिल्ह्यातील एकूण 122 धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची नोंदणी व धान खरेदी करण्याची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.