स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरिता आदिवासी उमेदवारांनी 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावे   

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरिता आदिवासी उमेदवारांनी 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावे   

 

भंडारा, दि. 17 : स्पर्धा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याने आदिवासी परिसरात महाराष्ट्र शासनाने स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण ही योजना सुरू केली आहे. माहिती व मार्गदर्शन प्रशिक्षण योजनेचे तिसरे सत्र तीन महिने पंधरा दिवसाचे असून ते 1 डिसेंबर 2022 ते 15 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाकरिता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, शाळा सोडल्याचा दाखला, बँकेचे पासबुक, आधार कार्ड व जातीच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह अर्ज 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गुरुद्वारा जवळ, देवरी जि. गोदिया येथे सादर करावा.

 

प्रशिक्षणासाठी उमेदवार आदिवासी जमाती प्रवर्गातील असावा, उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यातील रहिवासी असावा, प्रशिक्षणाचा यापूर्वी त्याने लाभ घेतलेला नसावा, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयातील ऑनलाईन नोंदणी कार्ड त्याच्याकडे असावे, उमेदवार एस.एस.सी. उत्तीर्ण असावा, उच्च शैक्षणिक पात्रता धारक व टंकलेखक/ संगणक/ लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार विद्यावेतन देण्यात यईल, असे आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी यांनी कळविले आहे.