बांधकाम साहित्य रस्त्यावर, १३ हजारांचा दंड

बांधकाम साहित्य रस्त्यावर, १३ हजारांचा दंड

 

चंद्रपूर १७ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या नागरीकांना १३ हजारांचा दंड तर विनापरवानगी बोरींग खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरीकांना ४००० रुपयांचा दंड करण्यात आला.

घर,इमारत किंवा इतर काही बांधकामास वाळु, विटा, खडी,लोखंड,गिट्टी, मुरूम याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. काही मालमत्ताधारक बांधकामादरम्यान सदर साहीत्य बाहेर ठेवतात. नियमानुसार बांधकाम साहीत्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खाजगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षीत आहे.

रस्त्यावर पडलेली रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडु शकतात. रस्ता जर अरुंद असेल तर रस्त्यावरील सामानामुळे पूर्णत: बंद होतो. वाहनधारक व पायी जाणाऱ्या नागरिकांना देखील या साहीत्यांचा अडथळा होतो. वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतुक कोंडी होऊ शकते त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्या ५ तर विनापरवानगी बोरींग खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ नागरिकांवर दंड ठोठावण्यात आला.