तलवारबाजी स्पर्धा संपन्न

तलवारबाजी स्पर्धा संपन्न

भंडारा, दि. 15 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे 14 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 14 वर्षाखालील मुले वयोगटात 10 संघ, 14 वर्षाखालील मुली वयोगटात 8 संघ, 17 वर्षाखालील मुले वयोगटात 15 संघ, 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 10 संघ, 19 वर्षाखालील मुले वयोगटात 10 संघ व 19 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 6 संघ असे 59 संघाचा स्पर्धेमध्ये समावेश होता.

स्पर्धेचे उद्घाटन एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इमले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, तलवारबाजी संघटनेचे सचिव सुनिल कुरंजेकर, शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव धनंजय बिरणवार, टेनिस व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव सुनिल खिलोटे उपस्थित होते.