उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अनुज्ञप्ती शिबीर आयोजित Ø वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अनुज्ञप्ती शिबीर आयोजित

Ø वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश

 

चंद्रपूर, दि. 15: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 22 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 24 नोव्हेंबर रोजी एन.एच.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 25 नोव्हेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर व 29 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.