जादुटोना विरोधी कायद्याच्या जनजागृती समिती सदस्य पदाकरिता प्रस्ताव आमंत्रित

जादुटोना विरोधी कायद्याच्या जनजागृती समिती सदस्य पदाकरिता प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर दि. 15 : नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम-2013 अस्तित्वात आहे. याअधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी समितीची दिनांक 2 मार्च 2022 च्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन अंतर्गत समिती सभा गठीत करण्यात येत आहे. या समितीमध्ये अशासकीय सदस्य व जिल्हा समन्वयक पदासाठी इच्छुक व्यक्तींनी आपल्या नावाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात सादर करावा, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.