महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्तीबाबत

महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्तीबाबत

गडचिरोली, दि.11:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंअंतर्गत सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील महाडिबीटी पोर्टलवरील विविध तांत्रिक कारणांमुळे गडचिरोली जिल्हयातील 2247 विद्यार्थी व 1980 महाविद्यालयांची शिष्यवृत्ती प्रलंबीत आहे, त्या अनुषंगाने सर्व गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले स्तरावरुन तांत्रिक समस्या कळवुन त्यांना महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती संबंधित खात्याविषयी जर तांत्रिक समस्या असल्यास आपण स्वत: प्राचार्य नात्याने लवकरात लवकर समस्येचे निराकरण करावे व तसा अहवाल सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयास त्वरीत सादर करावा. वरील सुचनेनुसार कोणताही इतर मागासवर्गिय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास व संबंधित महाविद्यालयाने तांत्रिक समस्या न सोडवल्यास व त्या अनुषंगाने महाविद्यालय अथवा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य या नात्याने आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल यांची गांभिर्याने नोंद घेण्यात यावी,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.