24 नोव्हेंबरपर्यंत भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

24 नोव्हेंबरपर्यंत भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

भंडारा, दि. 10 : जिल्ह्यात 10 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, आंदोलने व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच सद्या राज्यात राजकीय घडामोडी पाहता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 10 नोव्हेंबर पासून ते 24 नोव्हेंबर 2022 पर्यंत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी आकाश अवतारे यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.