दिनांक : 9 नोव्हेबर 2022 फिड इंडीया मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा

दिनांक : 9 नोव्हेबर 2022 फिड इंडीया मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा

भंडारा, दि. 9 : फिट इंडिया मोहिम सन 2019 पासून संपुर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. शालेय जिवनात विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ शारीरिक तंदुरुस्ती याबाबत जनजागृती करणेसाठी भारतीय खेळ प्राधिकरण, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय यांचे मार्फत फिट इंडिया मोहिमेअंतर्गत राष्ट्रीयस्तरावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येत आहे. जवळपास 3.25 कोटी रक्कमेची ही प्रश्नमंजुषा स्पर्धा स्टार स्पोर्टस वाहीनीवर थेट प्रक्षेपीत होणार आहे.

 

प्रश्नमंजुषा स्पर्धाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत असून अधिक माहितीसाठी https://fitindia.nta.ac.in या साईटवर जाऊन माहिती प्राप्त करुन घ्यावी. प्रत्येक शाळेतील किमान 2 विद्यार्थी इयत्ता 6 वी ते 12 वी या इयत्तेतील विद्यार्थी नोंदणी करु शकणार आहे. कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. प्रति विद्यार्थी रूपये 50 आवश्यक शुल्क भरल्यावरच नोंदणी पुर्ण मानली जाईल. शाळांनी रेकार्डसाठी नोंदणी पुर्ण केल्यानंतर पेमेंट प्रुफ आणि पृष्टीकरणे पृष्टाची प्रत ठेवणे आवश्य्क राहील. मोहिमेसाठी भारतीय खेळ प्राधिकरण यांचे मार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती करीता सहाय्यक संचालय भारतीय खेळ प्राधिकरण सचिन घायाळ यांच्याशी संपर्क साधावा व नोंदणी करतांना काही अडचणी येत असल्यास साई कॉल सेंटर येथे 18002025155, 18002585255, NTA हेल्प डेस्क क्र.01169227700 संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी कळविले आहे.