रा.तुकडोजी महाराजांचे उपासक सुबोधदादांची स्वच्छता अभियानाला भेट

0

रा.तुकडोजी महाराजांचे उपासक सुबोधदादांची स्वच्छता अभियानाला भेट

चंद्रपूर ८ नोव्हेंबर – अडयाळ टेकडीवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे उपासक सुबोधदादांनी पं. दीनदयाल उपाध्याय स्वच्छता मंडळाच्या स्वच्छता अभियानाला वसंतराव नाईक चौक येथे भेट दिली व अभियानाप्रति समाधान व्यक्त केले.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या मार्गदर्शनात वसंतराव नाईक चौक येथे पं. दीनदयाल उपाध्याय स्वच्छता मंडळातर्फे मंडळ प्रमुख प्रज्ञा गंधेवार यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी नागरीकांना स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेची गरज काय याबाबत माहिती दिली. परिसरातील दुकानदारांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. ओला व सुका कचरा व्यवस्थापन,घरी खत कसे तयार करावे याची माहीती देण्यात आली व सेंद्रिय खताच्या किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जगदीश चहांदे, विशेष गिरी, शुभम मेश्राम,रतन चहारकर, आशिष ताजने,संजय कोत्तावार, आनंद मांदाडे, राजेंद्र निषेकर,पुरुषोत्तम सहारे,विजय चिताडे, धर्माजी खंगार आदींची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here