दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष ग्रामसभा व विशेष शिबिराचा कालावधी निश्चित

1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष ग्रामसभा व विशेष शिबिराचा कालावधी निश्चित

चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर: 1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष ग्रामसभा/विशेष शिबिराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

असा आहे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत आयोजित कार्यक्रम:

एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे बुधवार, दि. 9 नोव्हेंबर 2022 रोजी, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी बुधवार, दि. 9 नोव्हेंबर ते गुरुवार, दि. 8 डिसेंबर 2022, मतदार नोंदणीसाठीची चार विशेष शिबिरे शनिवार दि. 19 नोव्हेंबर व रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022, तसेच शनिवार, दि. 3 डिसेंबर व रविवार, दि. 4 डिसेंबर 2022 रोजी,

ग्रामसभा मतदार वाचन व नोंदणी गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी, विद्यार्थी दिव्यांग व महिलांसाठी विशेष शिबिरे शनिवार, दि. 12 नोव्हेंबर व रविवार, दि. 13 नोव्हेंबर 2022, तृतीय पंथीय, देहव्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षीत घटकांसाठी विशेष शिबिरे शनिवार, दि. 26 नोव्हेंबर व रविवार, दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी, दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी सोमवार, दि. 26 डिसेंबर 2022 पर्यंत, तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी गुरुवार, दि. 5 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे.

विशेष मोहिमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहे. तरी, ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे यांनी केले आहे.