दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त  पुनरिक्षण कार्यक्रम

0

दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त  पुनरिक्षण कार्यक्रम

गडचिरोली, दि.03: दिनांक 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पुनरिक्षण कार्यक्रमात दिनांक 09 नोव्हेंबर,2022 (बुधवार)  रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल. दिनांक 09 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) ते दिनांक 08 डिसेंबर, 2022 (गुरूवार) रोजी पर्यत दावे व हरकती स्विकारण्यात येईल. दिनांक 26 डिसेंबर, 2022 (सोमवार) पर्यत दावे हरकती निकालात काढण्यात येईल. दिनांक 03 जानेवारी, 2023 (मंगळवार) पर्यत अंतिम प्रसिध्दीकरिता आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येईल. दिनांक 05 जानेवारी, 2023 (गुरूवार) रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

तरि गडचिरोली जिल्हयातील सर्व नवमतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली, संजय मीणा यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here