आयोगातर्फे सन 2023 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षाच्या अंदाजित वेळापत्रक

आयोगातर्फे सन 2023 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षाच्या अंदाजित वेळापत्रक

गडचिरोली, दि.01: सन -2023 मध्ये महाराष्टर लोकसेवा आयोगामार्फेत नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता आयोगामार्फेत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते, त्यानुसार सन- 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत.प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग,विविध विद्यापीठे,परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते.

 

जेणेकरुन आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत.याची दक्षता घेणे गरजेचे आहे.त्यानूसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे,असे सहसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई, सुनिल अवताडे यांनी कळविले आहे.