गडचिरोली| माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

गडचिरोली| माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

गडचिरोली, दि.31: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा प्रशासनाद्वारे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, नायक तहसिलदार अमोल गव्हारे, जिल्हा नाझर आशीष सोरते, अ.का. दुधबळे,अ.का.बागमारे, भैसारे,मेश्राम आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात आले.