आरसेटीव्दारे भाजीपाला लागवडचे निशुल्क प्रशिक्षण

आरसेटीव्दारे भाजीपाला लागवडचे निशुल्क प्रशिक्षण

भंडारा, दि. 31 : बॅंक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था द्वारे भाजीपाला लागवडचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 1 नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षणात भाजीपाल्याचे महत्व, व्यापकता, व्यावसायीक लागवड, पिकांची निवड, त्यांची लागवड, जमीनीची ओळख, बियाणे, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायातील संधी, बाजार सर्वेक्षण, बॅंकेच्या योजनांची माहिती दिली जाईल.

स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण 10 वी पास किंवा नापास, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बेरोजगार पुरुष, महिलांनी मुलाखतीकरिता 1 नोव्हेंबर 2022 ला सकाळी 10 वाजता स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था संचालक मिलिंद इंगळे यांनी केले आहे.

प्रशिक्षण प्रवेशासाठी आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधारकार्ड, मनरेगा कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवण, चहा, नाश्ता, वह्या-पुस्तके, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल. अधिक माहितीकरीता 8669028433, 9511875908 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.