सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

0

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

भंडारा, दि. 31: स्थानीय नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे तालुक्यातील सर्व विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तथा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार कुंभरे, प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, गट विकास अधिकारी टेंभरे , गटशिक्षणाधिकारी कोरे, भलावी प्राचार्य डोये,प्राचार्य हारगुडे, प्राचार्य कापगते, मुख्याध्यापक कोचे तथा नगरपरिषद, पोलीस विभागाचे समस्त कर्मचारी तथा शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या औचित्य साधून सामूहिक शपथ घेण्यात आली तसेच नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय ते बस स्थानक साकोली पर्यंत दौड घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. दरवडे ,फरकुंडे आणि आभार बाळू कापगते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here