पाण्यासाठी पायपीट थांबवा . नगरपंचायत सिंदेवाही ला आम आदमी पार्टीचा इशारा

पाण्यासाठी पायपीट थांबवा . नगरपंचायत सिंदेवाही ला आम आदमी पार्टीचा इशारा

सिन्देवाही ग्रामपंचायत असतांनासुध्दा सिन्देवाही शहराचा विकास झाला नाही सिन्देवाही परीसरातील नागरीकांना वाटत होते की, गांवाचा दर्जा वाढल्यावर तरी विकास होईल ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायत मध्ये करुन पंचायत तशीच ठेवली आणी पहिल्याच प्रयत्नात देशातील मोठ्या पक्षाने बाजी मारली आणी नंतर अर्धावरती डाव मोडल्याची कहाणी सुरु झाली . आणी आजतागायत आलेल्या निधिपैकी पुर्ण रक्कम खर्च झाली किंवा काय हे न समजनारे कोडेच आहे .पण विकासाच्या नावावर घाई—घाईने गरज नसेल तिथे कुठलेही रंग —रुप— आकार — लेवल —लाईन व एकसुत्रिपणा नसलेल्या नाल्या तसेच एक वर्षाचे आतच उखरनारे ,वेगवेगळ्या जाडीचे दर्जा हीन व जाईन्ट च्या ठिकाणि उंच सखल असणारे रोड च्या बाजुला क्राॅक्रिट/मुरुम न भरताच (अपघाताला आमंत्रण देणारे )क्राॅक्रिटचे रोड तयार केले .शहराअंतर्गत बर्‍याच प्रभागातील रोड विकास होण्याचे आधीच (एक वर्षाचे आतच) उखरण्यास सुरवात होवुन वेगाने उखरणे सुरु आहे .तसेच आधिच अतिक्रमनाच्या वीळख्यात असलेले अरुंद रस्ते व नालीत तसेच अनावश्यक ठिकाणी बोअरवेल तयार करुन वाहतुकीस अडथळा व अपघातास निमंत्रण दिले. ज्या ठिकानी आज पाण्याची सुविधा नाही व महीलांना लांबुन पाणि आणावे लागते अशा ठिकानी कुपनलीका केल्या नाहीत तेव्हा आम आदमी पार्टी च्या वतीने निवेदन देवून उपरोक्त कामाची व बोअरवेल च्या गरजेची चौकशी करुन कुपनलिका तात्काळ मंजुर करावी असे निवेदन मुख्याधिकारी यांचे कडे देण्यात आले त्यावेळेस “आप” चे मनोहर पवार ,विलास गंडाटे ,मंजुशा कुळमेथे ,शांता गोहने ,विमल गोहने ,प्रतिक्षा मेश्राम , सकुबाई बल्लेवार ,प्रेमीला खोबरे ,सुनिता चंदनखेडे ,दिपक सदनपवार व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.