पालकमंत्री वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

पालकमंत्री वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमिनी विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 26 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ब्रम्हपूरी तालुक्यातील एकारा येथे आदिवासी मोहल्ल्यातील सभागृहाचे तसेच जल शुध्दीकरण केंद्राच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता बोंद्रा (ता. ब्रम्हपूरी) येथे हनुमान मंदिराजवळील खुल्या जागेत समाज मंदीर बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 12 वाजता भुज (ता. ब्रम्हपूरी) येथे जलशुध्दीकरण केंद्र, सामाजिक सभागृह, जि.प.शाळेतील विज्ञान कक्ष आणि शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन. दुपारी 12.30 वाजता कोसंबी खड (ता. ब्रम्हपूरी)  येथे जलशुध्दीकरण केद्राचे भुमिपूजन.

दुपारी 1 वाजता वांद्रा (ता. ब्रम्हपूरी) येथे जलशुध्दीकरण केंद्र, सभागृह बांधकाम आणि वांद्रा -आक्सापूर – पवनपार – सायगाव – कमळगाव – मेंडकी ला जोडणा-या रस्त्याची सुधारणा कामाचे भुमिपूजन, दुपारी 1.30 वाजता सायगाव येथे दलित वस्तीमध्ये बौध्द समाज मंदीर व हनुमान मंदिराजवळ समाज मंदिराच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 2 वाजता कमळगाव (ता. ब्रम्हपूरी) येथे जलशुध्दीकरण केंद्र, समाज मंदीर बांधकामाचे तसेच जि.प.शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 2.30 वाजता गोगाव येथे गोगाव पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपूजन, दुपारी 3 वाजता गांगलवाडी (ता. ब्रम्हपूरी) येथे सामाजिक सभागृह, गांगलवाडी प्रा.आ.केंद्र ते राज्य मार्गाला जोडणा-या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपूजन, बौध्द मोहल्ल्यातील सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन.

दुपारी 4.30 वाजता बरडकिन्ही (ता. ब्रम्हपूरी)  येथे सामाजिक सभागृह, जलशुध्दीकरण केंद्र, गांगलवाडी – बरडकिन्ही रस्त्यावर लहान पुलाचे पुर्नबांधणी बांधकाम तसेच आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन. सायंकाळी 5.30 वाजता आवळगाव येथे जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन, सायंकाळी 6 वाजता हळदा (ता. ब्रम्हपूरी) येथे बौध्द समाज मंदीर, सामाजिक सभागृह आणि जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन, सायंकाळी 6.30 वाजता बोडधा येथे जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन, रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गुंजेवाही (ता. सिंदेवाही) येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन, सकाळी 10.30 वाजता कोटा येथे काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन, सकाळी 11 वाजता पवनचक येथे काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन, सकाळी 11.30 वाजता सावरगाटा येथे सावरगाटा – मरेगाव ते टकेरी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमिपूजन, दुपारी 12.30 वाजता पवनपार येथे जलशुध्दीकरण केंद्र व आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 1 वाजता मरेगाव येथे दलित वस्तीमध्ये सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता सिंदेवाही येथे पदाधिका-यांसोबत चर्चा, दुपारी 4.30 वाजता सिंदेवाही वरून सावलीकडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता सावली येथे पदाधिका-यांसोबत चर्चा, रात्री 8 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता डोंगरगाव मस्के (ता. सावली) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन, सकाळी 9.30 वाजता गेवरा (बुज) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन व तलाठी कार्यालयाचे लोकार्पण, सकाळी 10 वाजता मंगरमेंढा (ता. सावली) येथे लहान पुलाच्या बांधकामाचे तसेच जलशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन, सकाळी 11 वाजता पाथरी येथे तलाठी कार्यालयाचे लोकार्पण, दुपारी 3.30 वाजता गडचिरोलीकडे प्रयाण.

मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर सकाळी 9.30 वाजता मेंढा (ता. सिंदेवाही) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, सकाळी 10.20 वाजता विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे भेट व पाहणी, सकाळी 11 वाजता तांबेगडी (ता. सिंदेवाही) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी , सकाळी 11.20 वाजता तांबेगडी येथून उसेरपार – तुकूम कडे प्रयाण.

दुपारी 12 वाजता उसेरपार येथे (ता. सावली) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, दुपारी 12.30 वाजता पालेबारसा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, दुपारी 1 वाजता चिंमडा (ता. मूल) कडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता टेकाडी (ता. मूल) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, दुपारी 1.50 वाजता चिंमडा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी,

दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2.45 वाजता चंद्रपूरकडे प्रयाण, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची / परिसराच्या संदर्भात संबंधित अधिका-यांची दुपारी 3.15 वाजता नियोजन भवन येथे आढावा बैठक, सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.