भंडारा : आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेसाठी नृत्य पथकांकडून अर्ज आमंत्रित

आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेसाठी नृत्य पथकांकडून अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 23 : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नृत्य पथकांचे प्रस्ताव 15 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी कळवले आहे.

सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी नृत्य पथकातील कलाकार हे आदिवासी असावेत. किमान पंधरा कलाकारांचा समावेश असावा. पथकामध्ये 40 टक्के महिला सदस्य असाव्यात. कोणत्याही प्रकारचे गाणे, वाद्य यांचा रेकॉर्डिंग करून उपयोग करता येणार नाही. पथकातील कलाकारांना स्वतः गाणी म्हणून वाद्य वाजवावे लागेल. नृत्य कलाकारांचे मानधन प्रवास खर्च व दैनिक भत्ता, पेहेराव भत्ता शासन निर्देशानुसार देण्यात येईल. तरी नृत्य पथकाने अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा नमुना साक्षांकित करून द्यावा आणि हा नमुना प्रकल्प कार्यालयात उपलब्ध होईल.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, व्दितीय पारितोषिक तीन हजार रुपये तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये आहे. तरीदेखील इच्छुक पथकांनी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे. हे अर्ज आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह व प्रकल्प कार्यालय भंडारा येथे विनामूल्य उपलब्ध आहे, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळवले आहे