
चंद्रपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोरोना योध्यांनी मोठी भूमिका बजावली होती. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीनी आपले योगदान दिले होते. यामध्ये चंद्रपूर औष्णिक केंद्राने देखील योगदान दिले होते. त्याकाळात ज्या शेवटच्या घटकाकडे खायला अन्न नाही, त्यांना दररोज जेवण देण्याचे काम त्यांनी केले होते. परंतु आता दिवाळीच्या वेळेस या योध्यांची जबाबदारी वाढली असून यांनी जनजागृती करून दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबिण्याकरिता काम करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. ते औष्णिक विद्युत केंद्रातील कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योध्यांच्या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता राजेश राजगड़कर, जिल्हा कांग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, शासन काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी, दीपक खोब्रागडे, ऊर्जा फाउंडेशन अध्यक्ष राजकुमार गिमेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रझा यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. हातावर आणून पानावर खाणारा मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे. या विषाणुचे लोन शहरात व ग्रामीण भागात पसरले आहे. चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. त्यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी विविध संस्थांना पुढाकार घेऊन समाजातील शेवटच्या घटकाला साथ देण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी अनेक अनेक संस्था पुढे आल्या होत्या.
