दिनांक 22 नोव्हेंबर व 23 नोव्हेंबर रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहील

दिनांक 22 नोव्हेंबर व 23 नोव्हेंबर रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहील

गडचिरोली, दि.21: सर्व जनतेस तसेच वाहन चालक, मालक प्रवासी यांना सुचित करण्यात येते की, दिवाळी सणानिमित्त राज्यभरात नवीन वाहनांची मोठया प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. या कारणास्त्व अशा नवीन वाहनांना पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली हे दिनांक 22 नोव्हेंबर (शनिवार) व दि.23 नोव्हेंबर 2022,(रविवार) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणी व वसुलीचे कामकाजाकरीता कार्यालय सुरु राहील.

सर्व जनतेने तसेच वाहन चालक,मालक यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.