पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती. परंतु शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाली असल्याने ध्यान व भरडधान्य खरेदीकरीता एन.ई.एम.एल पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीत शेतकरी नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

 

खरीप पणन हंगाम 2022-23 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2022-23 पासून ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्या शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.