अर्ज परिपुर्ण भरुन 05 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करा

अर्ज परिपुर्ण भरुन 05 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करा

गडचिरोली,दि.21: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी ता. अहेरी/मुलचेरा/सिरोंचा जि. गडचिरोली अंतर्गत येत असलेले अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज महाडीबीटीवर (सन 2022-23) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आदिवासी विकास विभागाचे दिनांक 17 जानेवारी 2022 चे शासन निर्णयानुसार तसेच दिनांक 16 मार्च 2016 चे शासन निर्णयान्वये प्रस्तुत योजनेचा लाभ निशुल्क उपलब्ध असून सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज परिपुर्ण भरुन दिनांक 05.12.2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अहेरी ता.अहेरी,जि.गडचिरोली येथे सादर करण्यात यावे,असे सहा.प्रकल्प अधिकारी (प्रशा),एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अहेरी जि. गडचिरोली यांनी कळविले आहे.