शुद्धीपत्रक चामोर्शी येथील सर्व्हे क्र.122/1 च्या ऐवजी सर्व्हे क्र.140 व 141 

शुद्धीपत्रक चामोर्शी येथील सर्व्हे क्र.122/1 च्या ऐवजी सर्व्हे क्र.140 व 141

गडचिरोली, दि.19: याद्वारे सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, सन 2021-22 करीता गडचिरोली जिल्ह्यातील गौण खनिज खाणपट्टयाचे लिलाव 5 वर्षाकरिता मौजा भोगणबोडी ता. चामोर्शी येथील सर्व्हे क्र.122/1 चे लिलावाची प्रक्रिया पार पडलेली आहे. परंतू तालुका भूमी अभिलेख कार्यालय, चामोर्शी यांचे कार्यालयाद्वारे प्रत्यक्ष मोजणी केली असता सर्व्हे क्र.122/1 ऐवजी प्रस्तावित खाणपट्टाचा सर्व्हे क्र.140 व 141 असे असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे प्रस्तावित लिलावातील मौजा भोगणबोडी ता. चामोर्शी येथील सर्व्हे क्र.122/1 च्या ऐवजी सर्व्हे क्र.140 व 141 असे वाचावे असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.