मुकेश बिसने, आकाश खेडीकर व प्राची बागडे यांची जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत निवड

0

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा; जिल्हास्तरीय प्रशिक्षण व सादरीकरण स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

· मुकेश बिसने, आकाश खेडीकर व प्राची बागडे यांची जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत निवड

भंडारा, दि.17: नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा भंडारा येथे 14 ऑक्टोबर रोजी जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत स्पर्धेत 57 इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 34 उमेदवरांनी आपल्‍या नवसंकल्पनांचे सादरीकरण केले. त्यापैकी गुणानुक्रमे तीन उमेदवरांची प्रथम, द्वितीय, तृतीय अशी जिल्हास्तरीय निवड करण्यात आली.

 

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, प्रमुख पाहूणे म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, श्री. उमेश खारोडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा, श्री. ए. आर. रहमतकर, प्राचार्य शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा, श्री. बी. के. निंबार्ते, कं. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, श्री. सोनु उके नोडल अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक श्री. उमेश खारोडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा यांनी केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन आवाहन केले. तर श्रीमती मोरे उपजिल्हाधिकारी भंडारा यांनी कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण करण्यासारखे खूप काही असून या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना विकसीत करुन वेळ, पैसा, श्रम कशा पध्दतीने वाचेल याबाबत विद्यार्थ्यांनी जागृत राहावे असे सांगीतले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी विविध जागतीक उदाहरणे देवून विद्यार्थी दशेतच कशा पध्दतीने कौशल्य विकासीत करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यास विद्यार्थ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

 

जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत उपस्थित नवउद्योजक/उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती हर्षना वाहाने, धनाचल उद्योग समुह तुमसर यांनी त्यांच्या स्टार्टअप बाबत मार्गदर्शन केले. तर स्‍टार्ट अप कार्यशाळे करीता आमंत्रीत श्री. पंकज मुंदडा सनदी लेखापाल यांनी शासनाच्या विविध स्टार्टअप पॉलीसी बाबात विस्तृत मार्गदर्शन उपस्थित उमेदवार व विद्यार्थ्यांना केले. दुपारच्या सत्रात उमेदवारांचे सादरीकरण सत्र उपस्थित ज्युरीच्या समोर करण्यात आली व त्यापैकी गुणानुक्रमे तीन उमेदवरांची प्रथम, द्वितीय, तृतीय अशी जिल्हास्तरीय निवड करण्यात आली.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. सुधाकर झळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे श्री. बी, श्री. बी. के. निंबार्ते, कं. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, श्री. सोनु उके नोडल अधिकारी, मिरा मांजरेकर, एमजीएनएफ फेलो भंडारा, श्री. सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, श्रीमती आशालता वालदे वरिष्ठ लिपीक, श्रीमती प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, श्री. आय. जी. माटुरकर शिपाई यांनी परिश्रम घेतले.

 

तर जे. एम. पटेल महाविद्यालयामार्फत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डाँ. कार्तिक पनीकर, इंनोवेशन व इन्कयुबेशन सेल चे समन्वयक डाँ अपर्णा यादव, डाँ आनंद मुळे, डाँ प्रशांत मनुसमारे, डाँ गिरधारीलाल तिवारी, डाँ. समिना तडवी, प्रा. बोखरे, प्रा. शैलेश तिवारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डाँ. वीणा महाजन व डाँ. अजय घाटोले यांनी केले तर आभार प्रदर्शन मिरा मांजरेकर, एमजीएनएफ फेलो भंडारा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here