उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील होतकरू महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने फराळ विक्री स्टॉलचे उद्घाटन

उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील होतकरू महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने फराळ विक्री स्टॉलचे उद्घाटन

काल दिनांक 27/10/2021 ला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सिंदेवाही च्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील होतकरू महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिवाळी सना निमित्य शिवाजी चौक सिंदेवाही येथे दिवाळी फराळ ( बेसन लाडू, भाजणीच्या चकल्या, चिवडा, बालुशाही, तिळाच्या चकल्या, शेव इत्यादी ) विविध फराळाचे विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. सदर फराळ विक्री स्टॉलचे उद्घाटन  बाळबुधे मॅडम ( पं. स.सभापती) यांचे हस्ते रिबीन कापून करण्यात आले तसेच उदघाटन प्रसंगी संजय पुरी सर (गटविकास अधिकारी) दुपारे साहेब ( प.स.सदस्य),, घाटोळे सर (सहाय्यक गटविकास अधिकारी), नागरे सर BMM, मा. मडावी सर BM IBCB, उईके सर CC, उईके मॅडम CC, ग्रामसंघाचे पदाधिकारी व समूहातील महिला उपस्थित होते.