अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विभागांचा आढावा

????????????????????????????????????

अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विभागांचा आढावा

भंडारा, दि. 28 : विधीमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसीय जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जिल्हा परिषद सभागृहात सदर समितीने आज (दि.28) विविध विभागाचा आढावा घेतला.
सदर समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा असून इतर सदस्यांमध्ये आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, श्रीनिवास वनगा, अनिल पाटील, सहसराम कोरोटे, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेश पाटील यांचा समावेश आहे.
यावेळी अनुसूचित जमाती कल्याण समितीने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद / नगर पंचायत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा घेतला.
बैठकीला अनुसूचित जमाती कल्याण समितीचे उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड यांच्यासह जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, नागपूर आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.