कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा

कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा

भंडारा,दि.21:- महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 28 ते 30 ऑक्टोबर 2021 दरम्यान करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे औद्योगिक आस्थापना, व्यवसाय आणि उद्योग पुरेशा प्रमाणात सुरू नाहीत. बरेचसे कामगार गावी निघून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आस्थापनांना मनुष्यबळाची भासणारी कमतरता पाहता स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच नियोक्ते व रोजगार इच्छूक उमेदवारांच्या सोईसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर online job fair Bhandara-5 येथे घेवून आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी. तसेच नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर online job fair Bhandara-5 येथे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांचेशी 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.