जिल्हास्तरीय युवा संवाद उत्सवाचे आयोजन तरूण तरूणींनी सहभाग घ्यावे

जिल्हास्तरीय युवा संवाद उत्सवाचे आयोजन तरूण तरूणींनी सहभाग घ्यावे

भंडारा दि.8 : अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमीत्ताने जिल्हास्तरीय उत्सवाचे आयोजन या महिन्यात करण्यात येणार आहे. या निमीत्ताने युवकातील प्रतिभेला व्यासपीठ निर्माणा करूण देण्यासाठी जिल्हायुवा संमेलन भारत @2074 युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी तालुकास्तरावर सहभागी युवकांमधून चार युवकांची निवड करून त्यांना जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पधेसाठी स्पर्धक हा जिल्हयातील रहिवासी असावा. चित्रकला, कविता, लेखन व छायाचित्र स्पर्धेकरीता 15 ते 29 दम्यान वय असावे तर भाषण स्पर्धेकरीता 18 ते 29 वय असावे. मागील वर्षातील भाषण स्पर्धेतील विजेत्यांना या वर्षी सहभागी होता येणार नाही. एका स्पर्धकाला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. तालुका स्तरावरील विजेत्यांना प्रत्येकी 1500 रूपये तर जिल्हास्तरीय विजेत्यांना 5 हजार रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय स्पर्धांसाठी संपर्क करावा. तुमसर- डॉ. अरूणा थुल 9960674475, जयश्री बिसणे 7517662412, मोहाडी- स्मिता अंबादे 9949732603, आदर्श रामटेके 8767231093, पवनी- घडोले सर 8668431367, अनिल मुंडले 7350685934, लाखनी- अजिंक्य भांडारकर 9420366006, रूपाली मेश्राम 9623638463, साकोली- एन.सी. राहांगडाले 9881222169, प्रशांत घरडे 9284013714, भुमिता खरडे 9158071334, लाखांदूर- श्री.पंढरी 9158250078, छाया रासेकर 9370719366, भंडारा- क्रिष्णा पासवान 9422134001, अतुल गेडाम 9657289334.

तरी या युवा महोत्सवात जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन नेहरू युवा क्रेंदाचे अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी केले आहे.