चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

0

चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु वाहतुकीत जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांचा जाहीर लिलाव करावयाचा आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकीबाबत कोणास दावा करावयाचा असल्यास त्यांनी न्यायालयाचे आदेश व अन्य कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. पाटील यांना एक महिन्याचे आत सादर करुन वाहनाचा ताबा घ्यावा. अन्यथा, सदर वाहनाचा ई-लिलाव करुन लिलावाद्वारे प्राप्त रक्कम शासन जमा करण्यात येईल. जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांची यादी या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिक्षक संजय पाटील यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here